ओडिशा : आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यानेच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना झारसुगुडा (ओडिशा ) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या गोळीबारात नाबा दास यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
गोपालचंद्र दास असे गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री नबा दास हे ब्रजरानगर येथील बीजू जनता दल (बीजद) च्या कार्यालयचे उद्घाटन करण्यासाठी चालले होते. वाटेमध्ये गांधी चौक आला. तेव्हा आरोग्यमंत्री नबा दास हे कारमधून उतरून पायी पक्षाच्या कार्यालयाकडे चालले होते. त्याचवेळी गोपालचंद्र दास या पोलीस इन्स्पेक्टरने गोळ्या झाडल्या.
या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार करत गोपालचंद्र दास याला ठार मारले. नबा दास यांच्या छातीत गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने झारसुगुड़ा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. नबा दास यांना आता झारसुगुड़ा विमानतळावर आणण्यात येणार आहे. तिथून त्यांना भुवनेश्वरला नेण्यात येईल.
या घटनेची माहिती मिळताच ओडिसा पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. ज्या पोलिसाने गोळीबार केला, त्याची गांधी चौकाच्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी लागली होती. त्याने आपल्या सर्व्हिस पिस्तुलामधून मंत्री नबा दास यांच्यावर गोळी झाडली. त्याने हे कृत्य का केले, याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.
पण, राज्याच्या आरोग्य मंत्र्यावर भर चौकात गोळीबाराची घटना कशी घडली. सुरक्षा व्यवस्थेत एवढी मोठी चूक कशी झाली. याबद्दल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.