पुणे : महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या’ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यभरातील महिलांकडून उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत आता महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच चौथा-पाचवा हप्ता एकत्रच मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. दसरा नंतर दिवाळी सण येतो. या दिवसांत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत सांगितले आहे. राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये भाऊबीज म्हणून ऑक्टोबर महिन्यात देण्यात येणार आहे, असे अजित पवार म्हणाले होते. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होणार आहेत.
‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पैसे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा करताना सांगितले की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये बँक खात्यावर येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत जमा होणार आहेत. म्हणजेच साधारण येणा-या सहा ते सात दिवसांत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे उर्वरित रक्क्म जमा व्हायला सुरूवात होणार आहे.