बुलढाणा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लोकसभा लढविणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा पराभव झाला होता. काही फरकांनं त्यांना हार मानावी लागली होती. तर या मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापराव जाधव यांचा विजय झाला होता. ते बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. दरम्यान, यावर रविकांत तुपकर यांनी भाष्य करत आपल्या पराभवाची काही करणे सुद्धा सांगितली आहेत.
‘शपथविधी झाला असेल आणि राज्यातील राजकीय नेत्यांचं राजकारण संपलं असेल तर आता राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. लोकांना बियाणं मिळत नाही. पिक कर्ज मिळत नाही. ज्यांना निवडून दिलं त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा मोठा असंतोष आहे. एकावेळी शेतकऱ्यांच्या संयंमाचा बांध तुटू शकतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लोकसभेत जो झटका दिला तोच झटका विधानसभेलाही देतील’, असा इशारा रविकांत तुपकर यांनी महायुती सरकारला दिला.