पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वादळ उठल आहे. या भेटीमुळे सुरेश धस हे टीकेचे धनी बनले आहेत.. अशातच आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांनी केलेल्या गौप्यस्फ़ोटानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.. टीआरपी वाढवण्याकरता केलेले हे सगळं प्रकरण होतं.. राष्ट्रवादी काँग्रेसच महत्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना सूचना दिली असल्याचा गौप्यस्फ़ोट त्यांनी केला आहे. तसेच महायुतीत भाजप इतर पक्षांना बदनाम करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला देखील सपकाळ यांनी लगावला आहे.
बीड मधील प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले.. या प्रकरणानंतर परळी मधील अनेक प्रकरण एका मागून एक समोर आलेख खंडणी घोटाळे उघड झाले.. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार त्यांच्या पक्षातील बडे नेत्यांनी मोठी टीका केली.. भाजप आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र टीका केली होती.. त्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेल्या भेटीने नवीन वादळ निर्माण झालं.. त्यावर काँग्रेस मधूनच तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली.. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील आरोप का करण्यात येत होत याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गौप्य स्फोट केला..
या भेटीनंतर सुरेश धस यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे.. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घडवून आणली होती.. ज्या व्यक्तीने आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याचं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याच देखील सुरेश धस यांनी म्हटल आहे…
दरम्यान या भेटीबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर गौप्यस्फ़ोट केला.. सुरेश धस आणि मुंडे यांच्यात मतभेदावर चर्चा झाली.. दोघांमध्ये अनेक विषयावर मतभेद आहेत.. माझ्यासमोरच ही चर्चा झाली असून लपून-छपून कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं..