सांगली: एका धक्कादायक घटनेत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ८० वर्षीय संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर सोमवारी रात्री सांगली येथे एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. भिडे गुरुजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका जणाच्या घरी जेवणासाठी गेले होते. भिडे गुरुजी घराबाहेर पडले असता अचानक एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाला चावा घेतला. त्यांना तातडीने सांगलीतील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. संभाजी भिडे यांनी १९८० च्या दशकात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची स्थापना केली होती. या अंतर्गत अनेक उपक्रम केले जातात.
या घटनेमुळे भिडे यांच्या समर्थकांमध्ये आणि हितचिंतकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, जे त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या अपडेट्सची वाट पाहत आहेत. संभाजी भिडे यांच्यावरील हल्ल्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.