पुणे : गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून सायबर फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच झटपट पैसे कमावण्याच्या नादात ‘एव्हिएटर’ गेम खेळण्याचा प्रकार देखील वाढला आहे. अशातच आता पुण्यातील एका तरुणाला ‘एव्हिएटर गेमच्या ‘ नादात तब्बल ३९ लाख ७७ हजार रुपये गमवावे लागले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोथरूड येथील 30 वर्षीय प्रतीक घुगे या तरुणाने एव्हिएटर नावाच्या ऑनलाईन गेमच्या नादात तब्बल 39 लाख 77 हजार रुपये गमावले आहेत. एव्हिएटर हा एक ऑनलाइन बॅटिंग गेम आहे. या तरुणाला आकर्षक परताव्याच्या आमिषाने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी,विराट कोहली आणि उद्योगपती अनंत अंबानी यासारख्यांच्या सेलिब्रिटीचे डीपफेक व्हिडिओ दाखवून या गेममध्ये गुंतवण्यात आले होते. त्यानुसार त्याच्या एका व्हाट्सअप वर अनोखी लिंकसह गेमिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात आली. त्याने लिंक वर क्लिक करून खाते उघडले.सुरुवातीला त्यांने दहा हजार रुपये गुंतवले परंतु कोणताही नफा मिळाला नाही. त्यानंतर आणखी पैसे गुंतवणूक त्यांनी एवढी गुंतवणूक वाढवत नेली. पहिल्या गुंतवणुकीनंतर काही अंशी परतावा मिळाल्याने त्याने ५ लाख ८६ हजार रुपये गुंतवले. त्यावर फक्त १ लाख रुपये परत मिळाले. त्यानंतर त्याने 8 लाख 30 हजार रुपये गुंतवले यावर फक्त 2 लाख रुपये त्याला परत मिळाले.तरीही आशेवर पाणी न सोडता त्यानंतर त्याने 12 लाख 83 हजार रुपये गुंतवले अखेर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ त्याने पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. पोलिसांनी यातील ११ लाख फ्रीज केले असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान याप्रकरणी फिर्यादीने क्रेडिट कार्डमधून तसेच त्याचे वडील एमआयटीमध्ये कार्यरत असून त्यांच्याकडून काही पैसे देखील घेतले असून याचा अधिक तपास सुरू आहे.