Pune News :पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. पाच दिवस पोटात अन्न-पाणी न गेल्यामुळे जरांगे पाटील अशक्त झाले आहेत. उपोषणस्थळी कुटुंबियांना न आणण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले होते. दरम्यान, पाटील यांच्या आवाहनानंतरही त्यांच्या आईला आंदोलन स्थळी आणल्यामुळे त्यांनी भर स्टेजवर कार्यकर्त्यांना सुनावले. कुटुंब आणल्यावर मला त्रास होतो. पार जिवाला लागतं माझ्या. मी मरावं अशी इच्छा हाय का? तुम्ही बार बार कुटुंब आणून बसविता इथं, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. बोलतानाही त्रास होत आहे. स्टेजवर ते झोपूनच असतात. त्यांना पाहण्यासाठी आई प्रभावती या उपोषणस्थळी दाखल झाल्या. आईला पाहून जरांगे कार्यकर्त्यांवर भडकले. (Pune News) माझ्या आईला उोषणस्थळी कोणी आणले? तुम्हाला कुटुंबाला पाहिल्यावर मला त्रास होतो. माझ्या जिवाला लागतं… काय ऐकायचं तुहं? असं म्हणत जरांगे यांनी संताप व्यक्त केला.
मराठ्यांना वेड्यात काढू नका
यावेळी त्यांनी शिंदे समितीवरही भाष्य केलं. समितीचा आणि आमचा काही संबंध नाही. त्यांना एक पुरावा सापडला तरी आरक्षण देता येतं. मराठ्यांना वेड्यात काढू नका. तुम्ही समितीला 50 वर्षाची मुदत दिली तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही आंदोलनाची किती टप्पे पडले आम्हाला माहीत आहे. (Pune News) एक एक टप्प्यात काय करणार हे आम्हाला माहीत आहे. शेवटी सरकारला कुणाच्या तरी हातात जीआर द्यावाच लागणार आहे. अशी परिस्थिती येईली की सरकारला इथे येताच येणार नाही. कुणाकडे तरी जीआर द्यावा लागेल. मग हे आंदोलन थांबेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : विद्यापीठात प्राध्यापक असल्याच्या बतावणीने तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल
Pune News : भागीरथी missing’ चित्रपटाच्या पोस्टर आणि म्युझिक चे दिमाखादार सोहळ्यात लॉंचिंग