लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : बहिण- भावाच्या पवित्र प्रेमाचा प्रतीक मानला जाणारा रक्षाबंधन सण पाचगणी येथील विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर कॉलेजमध्ये मोठ्या साजरा करण्यात आला. स्कूलच्या विद्यार्थिनींनी ठाणेदारांसह पोलिसांना राख्या बांधल्या.
पोलीस अधिका-यांनी विद्यार्थिनींना दिली पोलीसखात्याची माहिती
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना माने यांनी पोलिस खात्याची माहिती दिली. (Pachgani News) यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, सहाय्यक फौजदार एन.एस.जाधव,विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर कॉलेजच्या डायरेक्टर भारती बिरामणे,मॅनेजिंग डायरेक्टर विराज बिरामणे, प्राचार्य मृनल महागावकर, ऑफिस कॉडीनेटर राजेन गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, रक्षाबंधना निमित्त स्कूलमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा झाली. कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेऊन स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिसांना बांधत विद्यार्थींनींनी बंधुभाव जोपासला. वाईट प्रवृत्तीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यार्थीनींनी व शिक्षिकेनी पोलिसांना राखी बांधली.
यावेळी बोलताना विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर कॉलेजच्या डायरेक्टर भारती बिरामणे म्हणाल्या, संपूर्ण देश रक्षाबंधनाचा सण साजरा (Pachgani News) करीत असतांना पोलिसबांधव कर्तव्यावर असतात. विविध सण समारंभ शांततेत अन सुव्यवस्थेत पार पडावेत म्हणून पोलिस बांधव रात्रंदिवस काम करीत नागरिकांच्या रक्षणाची हमी घेतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : वटवृक्षाला राखी बांधून केली दीर्घायुष्यासाठी प्रार्थना