लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : (स्व.) सुरेश बिरामणे यांनी पाचगणी व परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षणाबरोबरच, क्रिडा क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडावेत यासाठी घेतलेले परिश्रम प्रेरणादायी आहेत. क्रीडा स्पर्धांमुळे खिलाडू वृत्ती वृद्धिंगत होण्यास मदत होते, असे प्रतिपादन वाई किसनवीर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. समीर पवार यांनी केले.
तालुकास्तरीय आंतरशालेय ॲथलेटिक स्पर्धांचे उद्घाटन
पाचगणी येथील विद्यानिकेतन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय ॲथलेटिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पवार बोलत होते. (Pachgani News) या वेळी विद्यानिकेतन स्कूल ॲण्ड ज्यूनिअर कॉलेजच्या संचालक भारती बिरामणे, व्यवस्थापकीय संचालक विराज बिरामणे, मुख्याध्यापिका मृणाल महागावकर, समन्वयक राजन गाडेकर, शिक्षक अजय कांबळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख नितीन सपकाळ, प्रमोद म्हेत्रे, रमेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले पुढे म्हणाले की, ॲथलेटिझम हा ॲथलेटिक हालचाली कौशल्य विकासाचा परिणाम आहे. ज्यामध्ये चपळता, संतुलन, समन्वय, लवचिकता, वेग, सामर्थ्य आणि सहनशक्ती या तंत्रांचा समावेश होतो. (Pachgani News) विराज बिरामणे म्हणाले की, प्रत्येक स्पर्धकाने खिलाडूवृत्ती अवगत करून, उत्कृष्ट खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा. या स्पर्धांमधून भारताचे नेतृत्व करणारे स्पर्धक घडले पाहिजेत.
या तीन दिवसीय स्पर्धेत महाबळेश्वर तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणीतील टेबल लॅंडवरील अनधिकृत पत्र्याच्या स्टाॅलवर कारवाई
Pachgani News : ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ होणार १ ते ३ डिसेंबरदरम्यान