लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : महाबळेश्वर सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन यश संपादन केले पाहिजे. ही स्व. बाळासाहेब भिलारे दादांची तळमळ होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हि शिष्यवृत्ती चालू करण्यात आली आहे. हि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. असे प्रतिपादन महाबळेश्वर तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे यांनी केले आहे.
स्व. बाळासाहेब भिलारे स्कॉलरशिपचे वितरण
भिलार येथील हिलरेंज हायस्कुल मध्ये ‘स्व. बाळासाहेब भिलारे स्कॉलरशिप वितरण’ कार्यक्रमाप्रसंगी भिलारे बोलत होते. (Pachgani News) यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन. भिलारे, डॉ.आपटे, कारगील युद्धात सहभागी असलेले सैनिक संतोष रांजणे, गणपत पार्टे, राजेंद्र भिलारे,हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव जतीन भिलारे , संचालिका तेजस्विनी भिलारे, गणपत भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन भिलारे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून पुढे जाण्याची प्रेरणा गुणवंताकडून घ्यावी. भावी क्षेत्र निवडताना आपली आवड आणि क्षमता पहावी. शिक्षकांनीही अभ्यासाबरोबरच स्पर्धापरीक्षा, शिष्यवृत्तीकडे प्रभावीपणे लक्ष दिल्यास दादांच्या स्वप्नातील अधिकारी घडण्यास मदत होणार आहे
प्रास्ताविक करताना हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी भिलारे म्हणाल्या ” स्व.दादांची स्मृती, कार्य त्यांचे विचार, जपण्यासाठी या शिष्यवृती योजनेची सुरुवात केली आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना होत आहे.
दरम्यान, यावेळी इयत्ता पहिली ते नववी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यानाचा स्मृतिचिन्हे ,प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत जतीन भिलारे व तेजस्विनी भिलारे यांनी केले.(Pachgani News) तर दीपक दोडके यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर भिकू पिसाळ यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणी-वाई मार्गावरील अनधिकृत शेडचे पक्के बांधकाम हटवले