लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : अतिदुर्गम महाबळेश्वर तालुका विकासापासून कोसो दूर होता. परंतु स्व. बाळासाहेब भिलारे यांनी कल्पकतेने या तालुक्याला विकसनशील केले आहे. अशाच पद्धतीने शिक्षणापासून मागास राहिलेला हा तालुका अल्पावधीत गटशिक्षण अधिकारी आनंद पळसे यांनी शिक्षकांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये वेगळ्या उंचीवर नेला आहे. असे गौरवोद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले आहे.
पंचायत समितीतर्फ़े गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील न्यू इरा हायस्कूलच्या सभागृहात महाबळेश्वर पंचायत समितीचा गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. यावेळी बोलताना वरील गौरवोद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले. (Pachgani News ) यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, प्रवीणशेठ भिलारे, संजूबाबा गायकवाड, नितीन दादा भिलारे, बाजार समिती संचालक गुलाब गोळे, न्यू इराच्या संचालिका सुनिती झा, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी भिलारे, जतिन भिलारे, सहाय्यक गटविकास अधिकारी, सुनील पार्टे, व्याख्याते श्रीधर साळुंखे, राहुल घाडगे, पांडुरंग कारंडे, सुभाष कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी व्याख्याते श्रीधर साळुंखे म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थी केंद्रित शिक्षण नसावे. अनेक अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांवर लादला जातोय. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी अनेक कामात शासन त्याना गुंतवते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Pachgani News ) तर यावेळी राजेंद्र राजपुरे, संजूबाबा गायकवाड, सुनिती झा. यांचीही यावेळी भाषणे झाली.
दरम्यान, आ. पाटील यांचे हस्ते आदर्श शिक्षक अमित कारंडे (भोसे), शेखलाल पिंजारी (गावढोशी), रामचंद्र कांबळे (पाचगणी नगरपालिका शाळा), अर्चना भिलारे (उंबरी), अकबर हुसेन (नाकिंदा), अनिसा वारूणकर (माचूतर) विजय डुबे (तळदेव), फातिमा शारवान (नगरपालिका शाळा महाबळेश्वर), नितीन घोरपडे (आकल्पे ), अलका जाधव (पारसोंड), वैशाली नाळे (वानवली उत्तेकर), विलास मासाळ (कुरोशी), (Pachgani News ) कांतीलाल अडसूळ (कळमगाव), विकास आवळे (आवळन ), लक्ष्मण जाधव (दुधागाव) या आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल देवून सत्कार करण्यात आला.
शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा हा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. (Pachgani News ) या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आनंद पळसे यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतलिंग गुरुजी यांनी केले तर सुरेंद्र भिलारे यांनी आभार मानले.
विद्यार्थीभिमुख, समाजाभिमुख शिक्षणासाठी पाठपुरावा करताना शिक्षणाला समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवणारे गट शिक्षणाधिकारी आनंद पळसे कल्पकतेने योजनांची आखणी करतात. शैक्षणिक उपक्रम जबाबदारीने राबवतात. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्याच्या शाळा, शिक्षण प्रशासन याबाबत समाजात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. असे आमदार मकरंद पाटील यांनी या कार्यक्रमात आनंद पळसे यांचे कौतुक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणीतील आगळ्यावेगळ्या बस स्टाॅपमुळे पर्यटकांची गैरसोय दूर : राजेश माने
Pachgani News : पाचगणी पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार
Pachgani News : ई- केवायसी प्रकिया पूर्ण करण्याचे पाचगणी नगरपरिषदेचे आवाहन