Pachgani News : पाचगणी : येथील टेबल लॅंड पठारावर वीज पडून घोड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन वर्षे उलटूनही अद्याप भरपाई न मिळाल्याने महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी व महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल यांच्या वतीने महाबळेश्वर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी
निवेदनात म्हटल्यानुसार, निलेश रमेश मोरे (रा. गोडवली) हे पर्यटकांना घोडेस्वारी करण्याचा व्यवसाय पाचगणी टेबल लँड येथे करत होते. त्यांच्याकडे पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेकडील व्यवसाय परवाना आहे. मे २०२१ मध्ये टेबल लँड पठारावर घोडा चरण्यासाठी सोडला असता, वीज कोसळल्यामुळे घोडा जागीच मृत्युमुखी पडला. (Pachgani News) घोड्याचे मूल्यांकन दीड लाख रुपये असून, महसूल विभागाचे या दुर्घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसीलदारांकडे सादर केला होता. परंतु दोन वर्षे होऊनही भरपाई मिळालेली नाही.
दरम्यान, मोरे यांच्याकडे भाग भांडवल नसल्यामुळे गेली दोन वर्षांपासून त्यांचा घोडेस्वारीचा व्यवसाय ठप्प आहे. व्यवसायासाठी अन्य साधन नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. (Pachgani News) ही गंभीर बाब लक्षात घेऊन लोकनेते भगवानराव वैराट यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडी व महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल सरचिटणीस अभिजीत (सनी) ननावरे यांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून, पीडित कुटुंबांची होणारी उपासमार रोखून तत्काळ अर्थसहाय्य देण्याचे सहकार्य करावे, अशी विनंती संघटनेच्या वतीने केली.
या वेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, पप्पू मोरे, शुभम ननावरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : एकल प्लास्टिक वापरावर पाचगणीत कारवाई; दोन दिवसांत २५ हजारांचा दंड वसूल
Pachgani News : पाचगणीतील अवकाळी संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने वृक्षारोपण