Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : … तोपर्यंत मंत्र्यांचा सत्कार कांद्याचा हार घालून करा; कांदाप्रश्नी खासदार कोल्हे उतरले रस्त्यावर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 August 2023, 11:58

Pune News : पुणे : कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने १९ ऑगस्टपासून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के भरीव शुल्क आकारले आहे. अर्थ मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करणारी अधिसूचना जारी केली आहे. त्याविरोधात राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिकमधील बाजार समित्या सलग दुसऱ्या दिवशीही बंद आहेत. तर पुणे जिल्ह्यात आळेफाटा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे करत आहेत.

आळेफाटा येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

पुणे जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांना भक्कम साथ दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गेली अनेक वर्ष आम्हाला अनुदान नाही. (Pune News) आमच्यावर अन्याय करु नका, असे शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. आंदोलनाबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर हा विषय मांडला. मी स्वत: कांद्याचा हार घालून त्यांचा सत्कार करेन. राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की, आपला प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तो पर्यंत सगळ्या मंत्र्यांचा सत्कार कांद्याचा हार घालून करा, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

कोल्हे म्हणाले की, सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवली जात आहेत. कांदा उत्पादकांना चार पैसे मिळतील अशी अशा निर्माण झाली असताना, सहा-सात महिने पुरेल इतका कांदा देशात उपलब्ध असताना, मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे पाप केले आहे. निर्यात शुल्क लादणे ही अघोषित निर्यातबंदी आहे. नेपाळमधून टोमॅटो आयात करून त्याचे दर पाडले आता कांद्याचे दर देखील असेच पाडण्याचे काम सरकार करत असल्याचेही कोल्हे म्हणाले.(Pune News)  केंद्रीय नेत्यांचे स्वागत करणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना विनंती आहे की, जोपर्यंत कांद्यावरील निर्यातशुल्क मागे घेतले जात नाही, आणि कांद्याला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत केंद्रातील जो नेता महाराष्ट्रात येईल त्याची कांद्याची माळ घालून स्वागत करावं जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दुखः केंद्रातील भाजपच्या नेत्यांना समजेल असेही अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधला. फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधून त्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला. (Pune News)  केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यात दहशतवाद्यांची मोठी लिंक; पालकमंत्र्यांची माहिती; म्हणाले, ऐकूनच सर्वांना हादरा बसेल, झोप उडेल….

Pune News : ऑनलाईन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त, चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी..

Pune News : यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांची घोषणा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची निर्घृण हत्या? वैनगंगा नदीकाठी आढळल्या रक्ताच्या थारोळ्यात

Monday, 16 November 2026, 8:34

राज्यात हुडहुडी, पारा आणखी घसरणार! धुळे १०.४ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढण्याचे संकेत

Monday, 16 November 2026, 8:25

नोव्हेंबरच्या मध्यात हवामानाचा नवा बदल! सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; पुढील काही दिवस कसे असणार वातावरण? वाचा

Monday, 16 November 2026, 8:00

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39
Next Post

Pune News : तरुणाला अडवून, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; तिघे पोलिसांच्या ताब्यात 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp