लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : महाबळेश्वरसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले पाहिजे ही (स्व.) बाळासाहेब भिलारे यांची तळमळ होती. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या नावाने सुरू केलेल्या करियर अकॅडमीमुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यातूनच अधिकारी निर्माण होतील, असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
स्व. बाळासाहेब भिलारे करियर अकॅडमीचे उद्घाटन
भिलार (ता. महाबळेश्वर) येथील हिलरेंज हायस्कूल येथे (स्व.) बाळासाहेब भिलारे यांच्या जयंतीनिमित्त हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने (स्व.) बाळासाहेब भिलारे करियर अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते.
या वेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती संजय गायकवाड, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, (Pachgani News ) प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे, शशिकांत भिलारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गुलाब गोळे, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, संचालक जतीन भिलारे, तेजस्विनी भिलारे, महाबळेश्वर पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी आनंद पळसे, गणपत पार्टे, मनिष भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
(स्व.) बाळासाहेब भिलारे जयंतीनिमित्त अँको हॉस्पिटल, महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय, बालाजी ब्लड बँक यांच्यामार्फत नागरिकांची मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. (Pachgani News ) ग्रामस्थ मंडळ, भिलार आणि हिलरेंज परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. मनीषा मगर, अमोल जाधव, निलेश सणस, मोनाली शिर्के, जान्हवी लोहार, गोकुळ मंत्रे यांचा सहभाग होता.
भिलार येथील भजनी मंडळाच्या वतीने सुस्वर भजनाचा कार्यक्रम झाला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते (स्व.) बाळासाहेब भिलारे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (Pachgani News ) या वेळी मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे, प्रवीण भिलारे, नितीन भिलारे, जतीन भिलारे, तेजस्विनी भिलारे, संजय मोरे, अमित भिलारे, प्रकाश बेलोशे यांनी (स्व.) बाळासाहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : महाबळेश्वर तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रगतीपथावर नेला – आमदार मकरंद पाटील
Pachgani News : पाचगणीतील आगळ्यावेगळ्या बस स्टाॅपमुळे पर्यटकांची गैरसोय दूर : राजेश माने
Pachgani News : पाचगणी पोलिस ठाण्याला सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार