लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची व्याप्ती सध्या वाढविण्यात आली असून, त्यामध्ये सर्व केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका धारकांना समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. परंतु आपले नाव त्यामध्ये असल्यास ई- केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ही प्रकिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखील जाधव यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन
ई- केवायसी करून घेण्यासाठी आशा सेविका, सेतू केंद्र, महा-ई सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचगणी तसेच नगरपरिषद कार्यालय, पाचगणी येथे आपले कार्ड काढू शकता. शिवाय आपण स्वतः सुद्धा आयुष्मान अॅप मोबाईल प्ले स्टोअरच्या benificiary.nha.gov.in या लिंकवरून अॅप डाऊनलोड करू शकता. (Pachgani News) यामध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे तपासून घेवून, स्वतःचे व इतरांचे देखील ई- केवायसी पूर्ण करून कार्ड प्राप्त करता येईल.
अधिक माहितीसाठी पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. (Pachgani News) नागरिकांनी आयुष्मान कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : भिलार येथे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
Pachgani News : पाचगणीतील विद्यार्थ्यांनी अमृत कलशामध्ये पवित्र माती टाकत घेतली पंचप्राण शपथ
Pachgani News : पाचगणीतील शिवाजी चौकावर ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर; पोलिसांना मदत होणार