राजेंद्रकुमार गुंड
Old Pension | माढा : सध्या संपूर्ण राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि प्राथमिक व माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन (Old Pension) योजना लागू करावी याकरिता 14 मार्चपासून बेमुदत संप सुरू केला आहे.
या संपाला वाढता प्रतिसाद मिळत असतानाच माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे व करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे या दोघा शिंदे बंधूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या लेखी पत्राद्वारे कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. या दोघांनीची पत्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून कर्मचाऱ्यांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले पाठिंबा जाहीर केल्याचे लेखी पत्र…
शासनाने नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन देणे, काळ्या फिती लावून काम करणे, एक दिवस सामूहिक रजा आंदोलन करणे, सामूहिक मोर्चा काढणे आदी प्रकारच्या लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने शासनाकडे मागणी रितसर मागणी केली.
परंतु आजतागात शासनाने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. याच्या निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने हा बेमुदत बंद पुकारलेला आहे असे दोघांनीही आपापल्या पत्रात नमूद केले आहे.
शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही अत्यावश्यक व जिव्हाळ्याची मागणी आहे. त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या 14 मार्च पासूनच्या बेमुदत बंदला अनुक्रमे माढा व करमाळा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाच्या वतीने पाठिंबा जाहीर करीत आहोत असेही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या स्वतंत्र पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा…
Politics News : ..म्हणून शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेतला ; आमदार रविंद्र धंगेकर
Pachgani News | पाचगणी येथे शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन
Satara News : सतोबा मंदिर ते टाकेवाडी- येळेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर