Blood Donation Camp : संदीप टूले/ केडगाव (अहमदनगर) : रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान या रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या शस्त्रक्रियामध्ये किंवा गंभीर परिस्थितीत तसेच गरोदरपणात कित्येक बाळाचे आणि आईचे प्राण रक्तदानामुळे वाचलेले आपण पाहतच आलो आहोत.
अशीच काही मदत म्हणून आम्ही केडगावकर नावाने केडगाव, बोरीपार्धी व परिसरातील एकूण १६ सामाजिक संघटना एकत्र येऊन गेली ५ वर्ष या रक्तदान शिबिराचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे.
यावर्षी या रक्तदान शिबिरामध्ये ३५१ रक्तदात्यानी रक्तदान केले व या शिबिरास अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देत या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तर दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात जेष्ठ नेते महेश अण्णा भागवत, जिल्हा परिषदेचे मा. सदस्य बाळासाहेब कापरे, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दिलीप हंडाळ, मयूर सोळसकर, हर्षल भटवेरा, डॉ. वंदना मोहिते, डॉ. पार्थ गायकवाड, डॉ. सागर कदम, डॉ धिरेद्रं मोहन, मनोज गुंदेचा, सरपंच पुनम बारवकर व त्यांचे पती गौरव बारवकर आणि रूपाली राऊत या जोडीने सुद्धा रक्तदान करून सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांनी सुद्धा चांगला प्रतिसाद देत या रक्तदानात सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून नितीन जगताप, धनराज मासाळ, प्रीतम गांधी तसेच केडगावमधील सर्व संघटनांनी यामध्ये आयोजक म्हणून काम केले. तसेच नवकार ग्रुप डेव्हलपर्स यांनी रक्तदान शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.
गायकवाड दाम्पत्य सलग पाच वर्ष करताहेत जोडीने रक्तदान
आम्ही केडगावकर रक्तदान शिबिरामध्ये सचिन गायकवाड, नंदिनी गायकवाड या जोडीने सलग पाच वर्ष रक्तदान करून सहभाग घेत असून, या दाम्पत्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.