नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क पत्नीनं संपत्तीसाठी आपल्या पतीलाच जीवे मारण्याचा कट रचला आहे. अर्धांगिनीच आपल्या पतीच्या जीवावर उठली. संपत्ती हडपण्यासाठी पत्नीने आपल्या दोन साथीदारांची मदत घेऊन पतीला मारण्याचा प्लान आखला. ठरलेल्या प्लान प्रमाणे तिने दोन साथिदारांना घराजवळ बोलावले.
पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच त्याला बिअर पाजली आणि त्यानंतर साथीदाराच्या मदतीने गळा आवळून, तोंडावर उशी ठेवून मारण्याचा प्रयत्न केला. गळा आवळून पतीचा मृत्यू होत नसल्याने पत्नीने क्रूरतेने पतीच्या अंगावर साप सोडला आणि पतीला सर्पदंशही दिला. सोनी उर्फ एकता जगताप असं संशयीत आरोपी पत्नीचं नाव आहे. पोलिसांनी तिच्यासह अन्य २ अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.