नाशिक: नाशिक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहराच्या कामटवाडे परिसरात दिवसाढवळ्या एका विधीसंघर्षित तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. किरण चौरे असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत तरुण हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. चार हल्लेखोरांनी मिळून किरण चौरे याला दगडाने जबर मार दिला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.