अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आमदार लहामटे थोडक्यात बचावले आहेत. लहामटे यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली.
हा अपघात कोल्हार घोटी रोडवर विटे घाटात झाला. कारमध्ये आमदार किरण लहामटे यांच्याबरोबर त्यांचे स्वयं सहाय्यक आणि कार्यकर्ते देखील होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.