नाशिक : नाशिकच्या गौळाने गाव परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सराफ नगरमध्ये राहणाऱ्या आई-वडील आणि मुलगी अशा तिघांनी आत्महत्या केली आहे. अख्ख्या कुटुंबाने आयुष्य संपवल्यामुळे नाशिक शहरात एकच खळबळ माजली आहे.
विजय माणिक सहाने (वय-38), ज्ञानेश्वरी विजय सहाने (वय-29) आणि अनन्या विजय सहाने (वय-09) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत.
आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणी नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलीस तपास करीत आहेत.