पंढरपूर : राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा कार्तिकी एकादशीच्या पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करायचे की अजित पवार यांना हा पेच समितीसमोर निर्माण झाला होता. याबाबत समितीने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे यासाठी मार्गदर्शन मागवले होते. यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोण करणार हा पेच मंदिर समिती समोर कायम आहे. आज कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त बैठक होत असून कार्तिकी महापूजेला नेमकं कोणाला निमंत्रण द्यायचं याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.(Devendra Fadanvis)
आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राजकीय नेत्याला महापूजेसाठी बोलावू नये
सकल मराठा समाजाकडून आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना महापूजेसाठी बोलावू नये असे पत्र मंदिर समितीला दिले आहे. या पत्रात यंदा सामान्य वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा करा, मात्र जर उपमुख्यमंत्री अथवा कोणीही मंत्री आल्यास त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे.(Ajit Pawar)