नाशिक: देशात सोन्याच्या किमतीत चांगलीच वाढ होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला 1 लाखाच्या जवळ गेलेले सोने जवळपास 7 हजारांनी स्वस्त झाले परंतु या आठवड्यात पुन्हा तब्बल 4 हजारांनी महाग झाले, दरम्यान, आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात स्थिरता असून दर वाढीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. नाशिक सराफा बाजारात सातत्याने होत असलेल्या दर वाढीनंतर सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ३०० रुपयांची घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी ९६,७०० रुपये प्रति १० ग्रॅम असलेल्या २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ९६,४०० रुपयांवर आला आहे.
चांदीच्या किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. चांदीची किंमत आता प्रति किलोग्रॅम ९६,००० रुपये आहे. दर घसरल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, व्यापारी सावध आहेत. तज्ञांनी बाजारात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत सराफा बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे.