नाशिक : नाशिकमध्ये तरुणींच्या जाचाला कंटाळून २३ वर्षीय तरुणानी आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. नाशिकच्या सिडकोच्या कामटवाडे परिसरात ही घटना घडली असून या घटनेने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी खळबळ उडाली आहे. ललित बाळासाहेब कोयटे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आर्थिक व्यवहार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
याप्रकरणी ललितच्या दोन मैत्रिणी आणि एक मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिज्ञासा, मीना आणि ओंकार असं गुन्हा दाखल झालेल्या मित्रांची नवे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ललितचा बळी मंदिराजवळ कॅफेचा व्यवसाय होता. ललित यांने त्याची मैत्रिण जिज्ञासाकडून 1 लाख रुपये घेतले होते. 1 लाखांपैकी ललितने 40 हजार रुपये परत केले होते. तर 60 हजार रुपये देणे बाकी होते. ललित उरलेले पैसेही देणार होता. मात्र, ललितची मैत्रिणीसह आणि दोघांनी त्याच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. मैत्रिणीने घरी येऊनही गोंधळ घातला होता. तिघेही ललितच्या मित्रांना फोन करुन पैशांच्या व्यवहाराबाबत सांगत होते. ओंकारने देखील ब्लॅकमेल केल्याचं ललितने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, ललितने बाईक आणि आईचे दागिने विकून मैत्रिणीला पैसे दिले होते. मात्र जिज्ञासाने उरलेल्या पैशांच्या बदल्यात चारचाकी गाडीची मागणी केली होती. या सर्व गोष्टींना कंटाळून ललितने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.