सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. अंगावर विज पडून ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लावण्या हनुमंता माशाळे असं या मुलीचं नावं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लावण्या माशाळे हिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज सकाळपासून कडक उन असताना अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी लावण्याच्या अंगावर वीज पडली. तीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.