पुणे प्राईम न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सत्तासंघर्षावर शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीत राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार या दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. खासकरून अजित पवार गटाने शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदावरील निवड ही घटनेला धरून नाही. तसेच ते मनमानी पद्धतीने पक्ष चालवत असल्याचा मोठा आरोप केला. हा आरोप शरद पवार गटाने तेवढ्याच ताकदीने फेटाळून लावला. आमच्या पक्षातून केवळ आमदारांचा एक गट बाहेर पडला आहे. पण मूळ पक्ष आमच्याकडेच आहे, असा दावा देखील या गटाने केला. या प्रकरणी सोमवारी सायंकाळी 4 वा. पुन्हा सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीनंतर राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आले. जोपर्यंत चिन्हावर निर्णय होत नाही तोपर्यंत ते आम्हाला द्यावं, ते गोठवू नये अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची लढाई निव़डणूक आयोगात सुरू असून दोन्ही बाजूंनी आज जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या सुनावणीच्या वेळी स्वतः शरद पवारांनी उपस्थिती लावली. शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी तर अजित पवार गटाकडून मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला.