(Nashik News) नाशिक : मुंबईहून नागपूरच्या दिशेने चाललेल्या (running) सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये (Sevagram Express) यवतमाळ येथील एका महिलेला प्रवास करत असताना नाशिकजवळ ((Nashik News) प्रसूतीकळा येऊ लागल्या. डब्यातील महिलांनी प्रसंगवधान राखत घोळका करूनच बसलेल्या होत्या, मात्र प्रसूती कळा सुरू होताच त्यांनी महिलेला रिंगण केले. ही संपूर्ण लगबग जनरल डब्यात सुरू होती. त्याच वेळेला काही प्रवाशांनी दुसरीकडे प्रार्थना सुरू केली. (mother named the baby ‘Nashik’)
आईने बाळाचे नाव नाशिक ठेवले
एकीकडे प्रसूती कळा सुरू असल्याने महिला जोरजोरात ओरडत होती, आणि दुसरीकडे प्रार्थना सुरू होती. त्यामध्ये जवळपास नाशिकरोड स्टेशन निघून गेले. अखेर नाशिकरोड रेल्वे स्थानक क्रोस केल्यानंतर या महिलेने एका गोंडस बाळाला baby was born) जन्म दिला. एका महिलेने विचारले की, आता कुठले स्टेशन गेले, तर सर्वानी नाशिक रोड म्हणून सांगितलं , म्हणून त्या महिलेने आपल्या बाळाचे नाव देखील ‘नाशिक’ (Baby ‘Nashik) ‘ठेवले आहे. खरंतर धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म, आणि बाळाचे नामकरणही झाले. रेल्वेतील संपूर्ण वातावरणच बाळाच्या जन्मानंतर बदलून गेल्याचे दिसून आले.
महिलेने एका गुटगुटीत बाळाला सुखरूप जन्म दिल्यानंतर संपूर्ण डब्यात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी रेल्वे डब्यात एकाच जल्लोष झाला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. सर्वानी टाळ्यांच्या गजरात बाळाचे स्वागत केले. एकूणच ही संपूर्ण घटना सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये चर्चेचा विषय ठरली असून रेल्वेच्या वर्तुळातही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, बाळाला जन्म दिलेली महिला आणि सोबत असलेल्या महिला या मुंबईत केटरिंगचे काम करत होत्या. मुंबईवरून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. त्या यवतमाळकडे चालल्या होत्या. आणि त्याच दरम्यान ही प्रसूतीची घटना समोर आली आहे. खरंतर धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म, आणि बाळाचे नामकरणही झाले. त्यामुळे बाळाचे नाव नाशिक ठेवल्याचे संपूर्ण प्रवासी डब्यात ही बाब समजली आणि प्रत्येक जण येऊन बाळाला पाहात होता आणि आपल्या परीने महिलेला मदत करत होता.