Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचे अंतिम संरेखन मंजुरीसाठी सादर; किती जिल्हे अन् गावातून जाणार? कसा असेल महामार्ग?

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 26 January 2026, 12:49

मुंबई: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला तरी, विविध जिल्ह्यांतील वाढता विरोध या प्रकल्पासमोर मोठे आव्हान ठरत आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गसह अनेक भागांत शेतकरी व जमीनधारकांनी आंदोलन छेडले असतानाही सरकार प्रकल्प राबवण्यावर ठाम असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) महामार्गाचे सुधारित आणि अंतिम संरेखन निश्चित करून ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केले आहे. (Nagpur-Goa Shaktipeeth Expressway)

395 गावांवर या प्रकल्पाचा थेट परिणाम

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या संरेखनामुळे नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी आता 856  किलोमीटर झाली आहे. यापूर्वी हा महामार्ग 840 किमीचा प्रस्तावित होता. सुधारित आराखड्यानुसार हा महामार्ग राज्यातील 13  जिल्ह्यांतून जाणार असून सुमारे 395 गावांवर या प्रकल्पाचा थेट परिणाम होणार असून या प्रस्तावाला राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिलेली नाही.

सरकारकडून मान्यता मिळताच भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यात येणार असल्याचे संकेत एमएसआरडीसीकडून देण्यात आले आहेत. मात्र भूसंपादन हा या प्रकल्पातील सर्वात संवेदनशील मुद्दा ठरला असून, याच कारणामुळे अनेक ठिकाणी आंदोलन तीव्र झाले आहे.

 

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला 12 जिल्ह्यांना जोडणाऱ्या सुमारे 803 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे संरेखन तयार करून ते सरकारकडे सादर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर याला विरोध करण्यात आला होता.

सुपीक शेती जाण्याची भीती, धार्मिक स्थळांना संभाव्य धोका, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि योग्य मोबदल्याबाबतची अनिश्चितता या मुद्द्यांवरून शेतकरी व स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. काही भागांत प्रकल्प रद्द करण्याची, तर काही ठिकाणी संरेखन बदलण्याची मागणी करण्यात आली.

वाढत्या विरोधाची दखल घेत राज्य सरकारने ज्या भागांत तीव्र असंतोष आहे, त्या ठिकाणचे संरेखन बदलून सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले. त्यानुसार प्रथम 840 किमीचे सुधारित संरेखन तयार करण्यात आले. मात्र तांत्रिक अडचणी आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता पुन्हा नव्याने अभ्यास करून आणखी बदल करण्यात आले.

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, नव्याने निश्चित केलेला अंतिम संरेखन प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार महामार्गाची लांबी  840 किमीवरून वाढून 856 किमी झाली असून, सरकारच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यातील नामांकित हॉटेल्स अन् रेस्टॉरंट्सवर FDAची कारवाई; १२ जणांचे परवाने तडकाफडकी निलंबित

Wednesday, 22 July 2026, 22:00

पळसनाथ विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा! भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जयघोष…

Wednesday, 22 July 2026, 21:53

प्रेमासाठी नव्हे तर पैश्यांसाठी ठेवले संबंध! शिक्षिकेचे अनेक वर्षांपासून मित्रासोबत संबंध; मित्राची नियत फिरली अन् घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 21:15

वंचित बहुजन आघाडीची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक! पुण्यात सकाळी १० वाजता होणार आंदोलनाला सुरुवात

Wednesday, 22 July 2026, 20:23

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! आठव्या वेतन आयोगामुळे पगार किती वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Wednesday, 22 July 2026, 19:37

डाळिंब येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन – अध्यक्ष राजेंद्र कांचन यांची माहिती..

Wednesday, 22 July 2026, 19:28
Next Post

पिंपरी-चिंचवडच्या कानाकोपऱ्यात एआयचा पहारा; सरकारचा मोठा 'हाय-टेक' निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.