Nagar News : कोतवाली. (नगर) : कोतवाली परिसरातून नागरिकांचे गहाळ किंवा चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी ४ लाख २० हजार रुपयांचे २० महागडे मोबाईल हस्तगत केले. हे सर्व मोबाईल पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शुक्रवारी (ता. ०६) संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.
तक्रारदारांनी मानले कोतवाली पोलिसांचे आभार
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अंमलदारांना दिल्या होत्या. (Nagar News) त्यानुसार मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीतील तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीचे २० महागडे मोबाईल हस्तगत करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.
चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. विशेष म्हणजे यातील काही तक्रारदारांनी गेलेला मोबाईल परत मिळेल, (Nagar News) ही आशाही सोडून दिली होती. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक सलीम शेख, राजेंद्र फसले, दक्षिण मोबाईल सेलचे शिंदे यांनी कारवाई केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : मित्राला लुटणाऱ्या सराईत आरोपीला कोतवाली पोलिसांकडून बेड्या..
Nagar News : सराफ व्यावसायिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी; पीआय चंद्रशेखर यादव यांचं आवाहन