Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : सराफ व्यावसायिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी; पीआय चंद्रशेखर यादव यांचं आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 October 2023, 18:23

Nagar News  : अहमदनगर : सराफा बाजारात तीन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सराफ व्यावसायिकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सराफ व्यवसायिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काळजी घ्यायला पाहिजे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच सराफा बाजाराच्या सुरक्षेसाठी लवकरच सीसीटीव्ही यंत्रणा त्यासोबतच खाजगी सुरक्षारक्षक व पोलिसांची सुरक्षा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

सराफ बाजारात २४ तास सशस्त्र पोलिसाची नेमणूक

सराफा व्यावसायिकांची पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन सर्वांच्या मदतीने सराफा बाजारात खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. सर्व सराफ व्यावसायिक, कोतवाली पोलीस आणि सिक्युरिटी गार्ड असा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर रात्रगस्त करणाऱ्या सिक्युरिटी गार्ड यांचा पाठपुरावा घेतला जात होता. (Nagar News ) मात्र, मध्यंतरी खाजगी सुरक्षारक्षकांना त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे काम थांबले होते. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी पुढाकार घेऊ पुन्हा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. त्यासोबतच सराफा बाजारातील सर्व रस्त्यांवर रात्री सुरक्षारक्षक बॅरिगेटिंग लावतील व सकाळी काढतील.

तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये व घडल्यास त्याचा तात्काळ उलगडा व्हावा, यासाठी सराफा बाजारात चांगल्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविण्याचा निर्णय सराफा व्यावसायिकांनी बैठकीत एकमताने घेतला आहे.

सराफ व्यावसायिकांना केलेल्या सूचना

 

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सराफ व्यावसायिकांना काही सूचना केल्या. त्यामध्ये दुकानाचे शटर आडवे रोलिंग शटर बसवावे किंवा उभ्या शटरला दोन ठिकाणी सेंट्रल लॉक करावे. तसेच शटर, दरवाजा आणि खिडक्यांना सायरनची यंत्रणा लावावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि त्याचा डीव्हीआर हा कोणालाही दिसणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावा. (Nagar News ) दुकानात पूर्ण वेळ सुरक्षारक्षक नेमावा, सराफा बाजारात कोणीही संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती कोतवाली पोलिसांना द्यावी.

बाजारात २४ तास सशस्त्र पोलिसाची नेमणूक

सराफा बाजारात झालेल्या चोरीनंतर सशस्त्र पोलिसाची नेमणूक बाजारात करण्यात यावी, अशी मागणी सराफ व्यावसायिक यांनी केली होती. (Nagar News ) सराफ व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक यादव यांनी दिवसा व रात्री सशस्त्र पोलीस कर्मचारी सराफा बाजारात २ दिवसांपासून तैनात केल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा, नगर शहर सराफ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, सुभाष मुथा, सुभाष कायगावकर, राजेश मिरांडे, प्रकाश हिंगणगावकर, आनंद मुथ्था, शिवनारायण वर्मा, रमेशशेठ टाकळकर, विजय कुलथे, प्रकाश देवळालीकर व इतर 60 ते 70 सराफ व्यावसायिक आणि पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे, वैशाली पठारे, सचिन गायकवाड, वंदना काळे आणि पोलीस अंमलदार सुभाष गर्गे, देवेंद्र पांढरकर, योगेश खामकर आदी उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Nagar News : तोतया पोलीस अधिकाऱ्याला कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Nagar News : कोयत्याच्या धाक दाखवून मंडप व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ; कोतवाली पोलिसांची कारवाई..

Nagar News : चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना बेड्या ; ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Friday, 25 September 2026, 7:27

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24
Next Post

Pimpri News : पिंपरीत वस्त्यांमधील घराला ‘गुगल प्लस कोड’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp