Mumbai News : मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात. सध्या ते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. येत्या १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने दादरच्या शिवतिर्थ परिसरात मनसेने बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे. या बॅनर्समुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Raj Thackeray, the future Chief Minister of Maharashtra? Birthday Banners; Calling only for a gift of good luck!)
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. पक्षनेत्रुत्वाने त्या-त्या राज्यातील स्थानिक नेत्रुत्वाला जबाबदारी नेमून दिली आहे. आपलीच सत्ता आणण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांनी बांधला आहे. मनसेही त्याला अपवाद नाही. मनसेनेही मुंबईत बॅनरबाजी सुरू केली आहे. (Mumbai News) त्यातच १४ जून रोजीचा राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने दादरच्या शिवतिर्थावर भला मोठा बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा सुरू
या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांचाही मोठा फोटो आहे. पदाधिकारी आणि नेत्यांचेही फोटो आहेत. राज ठाकरे यांच्या फोटोशेजारी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असं ठळक अक्षरात लिहिलं आहे.(Mumbai News) शिवतिर्थावर हे फोटो लागल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आगाममी निवडणुकीत राज्याची सत्ता आणण्याच्या दृष्टीने मनसे कामाला लागणार असल्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत.
वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त हजारो महाराष्ट्र सैनिक मला भेटायला, शुभेच्छा द्यायला योतात. तुमची भेट आणि तुमचे शुभचिंतन हीच माझ्यासाठी बहुमूल्य भेट आहे. तरीही माझ्यावरील तसेच पक्षावरील प्रेमापोटी महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. (Mumbai News) पण माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. फक्त तुमच्या प्रेमळ शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी आवाहन केले की, तुम्हाला एखादी भेट आणायची इच्छा असेल तर, झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या, पुस्तकं किंवा इतर एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. (Mumbai News) तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल याची मला खात्री आहे, असं आवाहन करतानाच १४ जून रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मी उपलब्ध असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.