Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: भंगाळे रुग्णालयाची नोंदणी रद्द; मृत अर्भक आणि मानवी अवयव कचऱ्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 27 May 2025, 7:44

दौंड : दौंड शहरातुन एक मोठी बातमी समोर आली आहे.  येथे गोपाळवाडी परिसरातील नागरी वस्तीतील कचऱ्यात, बरण्यांमध्ये अर्भक आणि मानवी अवयव टाकून दिल्याचे तपासात समोर आले  होते. हे बरण्यांमधील अर्भक आणि मानवी अवयव दौंड येथील भंगाळे रुग्णालयाचे असल्याचे निष्पन्न झाले  होते. आता या प्रकरणी पुणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी भंगाळे रूग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले असून यासंदर्भाची नोटीस संबंधित रुग्णालयास बजावण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड-कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जिजामाता नगर येथे प्लास्टिक बरण्यांमध्ये एक १८ ते २० आठवडे वय असलेले पुरुष जातीचे मृत अर्भक २५ एप्रिल रोजी आढळून आले होते. तसेच शस्त्रक्रिया दरम्यान काढलेले गर्भाशय, स्तन, वृषण, आदी मानवी अवयव सबंधितांच्या नावासह बरण्यांमध्ये आढळले होते. शहरातील दौंड-सिध्दटेक अष्टविनायक मार्गावरील भंगाळे क्लिनिक अॅण्ड नर्सिंग होम या रुग्णालय आहे. आढळलेले मानवी अवयव आणि अर्भक हे या रुग्णालयाचे असल्याची माहिती दौंड पोलिसांच्या तपासात समोर आली होती.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. यमपल्ले यांनी या रुग्णालयास भेट दिली. तेंव्हा या प्रकरणी गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. भंगाळे रुग्णालयास नोटीस बजावून त्याबाबत खुलासा मागविण्यात आला होता. रुग्णालयाने केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासन व व्यवस्थापनाकडून शरीरशास्त्र कायदा १९४९, वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ व बॉम्बे नर्सिंग होम अक्ट १९४९ चा भंग झाल्याचे आढळून आले होते. त्यानुषंगाने रुग्णालयाची बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट आणि वैद्यकीय गर्भपाताची कायद्याने झालेली रुग्णालयाची नोंदणी २१ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. असे डॉ. एन. एस. यमपल्ले यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे. याबरोबरच यापुढे भंगाळे रुग्णालयाने आंतररुग्ण भरती करु नयेत, असे देखील सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना तशी नोटीसही बजावण्यात आली आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण..! माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.