Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? वाढदिवसानिमित्त लागले बॅनर्स; फक्त शुभेच्छांची भेट देण्याचे आवाहन!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 June 2023, 12:18

Mumbai News : मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात. सध्या ते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. येत्या १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने दादरच्या शिवतिर्थ परिसरात मनसेने बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे असा उल्लेख केला आहे. या बॅनर्समुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Raj Thackeray, the future Chief Minister of Maharashtra? Birthday Banners; Calling only for a gift of good luck!)

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. पक्षनेत्रुत्वाने त्या-त्या राज्यातील स्थानिक नेत्रुत्वाला जबाबदारी नेमून दिली आहे. आपलीच सत्ता आणण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षांनी बांधला आहे. मनसेही त्याला अपवाद नाही. मनसेनेही मुंबईत बॅनरबाजी सुरू केली आहे. (Mumbai News) त्यातच १४ जून रोजीचा राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने दादरच्या शिवतिर्थावर भला मोठा बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा सुरू

या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांचाही मोठा फोटो आहे. पदाधिकारी आणि नेत्यांचेही फोटो आहेत. राज ठाकरे यांच्या फोटोशेजारी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असं ठळक अक्षरात लिहिलं आहे.(Mumbai News)  शिवतिर्थावर हे फोटो लागल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आगाममी निवडणुकीत राज्याची सत्ता आणण्याच्या दृष्टीने मनसे कामाला लागणार असल्याचे संकेतही या निमित्ताने मिळत आहेत.

 

वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना एक कळकळीचं आवाहन केलं आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त हजारो महाराष्ट्र सैनिक मला भेटायला, शुभेच्छा द्यायला योतात. तुमची भेट आणि तुमचे शुभचिंतन हीच माझ्यासाठी बहुमूल्य भेट आहे. तरीही माझ्यावरील तसेच पक्षावरील प्रेमापोटी महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. (Mumbai News) पण माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. फक्त तुमच्या प्रेमळ शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी आवाहन केले की, तुम्हाला एखादी भेट आणायची इच्छा असेल तर, झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या, पुस्तकं किंवा इतर एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. (Mumbai News) तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल याची मला खात्री आहे, असं आवाहन करतानाच १४ जून रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मी उपलब्ध असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका; अजित पवार यांचे भाष्य! म्हणाले,…

Mumbai News : परदेशात हेलिकॉप्टरच्या वाऱ्यानं पीच सुकवलं; आपण हेअर ड्रायरने… राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल!

Mumbai News : ना सुरक्षारक्षक, ना कार्यकर्त्यांचा लवाजमा… सर्वत्र मंत्री गिरीश महाजनांच्या एकट्याने प्रवासाची चर्चा!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Pune News : पुण्यात तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.