बीड : माजलगाव तालुक्यातील संगम येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीतम गोपिनाथ मुंडे या उपस्थित होत्या. हा कार्यक्रम सुरू असतानाच मुंडे यांना स्टेजवरच अचानक भोवळ आली. यामुळे पाठीमागे असलेल्या खूर्चीवर त्या तात्काळ बसल्या. हा प्रकार गुरुवारी दुपारच्या सुमारास घडला.
त्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांना तातडीने परळी येथील निवासस्थानी हलविण्यात आले. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असून प्रकृती उत्तम असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. ऊन, वेळेवर जेवण नसणे आणि धावपळ गोष्टींमुळे ही भोवळ आल्याचे सांगितले जात आहे.