वाळूज महानगर : प्लॉट घेण्यासाठी आई-वडीलांकडून ३० लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत २३ वर्षीय विवाहितेचा गर्भपात केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत महिलेला विवाहानंतर महिनाभर तिला सासरच्या लोकांनी चांगले वागविले. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून त्रास देणे सुरू झाले. ३० एप्रिल रोजी पीडीत दीक्षाला सासरच्यांनी बळजबरीने गर्भपात करण्यासाठी अंबेलोहळ येथे नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
या प्रकरणी निलेश साठे, दामोदर साठे, मीरा दामोदर साठे, संतोष दामोदर साठे, रचना संतोष साठे, स्वाती प्रवीण पोळ, प्रवीण पोळ (रा. सर्व कमळापूर फाटा, गांधीनगर, रांजणगाव शेणपुंजी ता. गंगापूर) या सात जणांच्याविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.