छत्रपती संभाजीनगर : जवळच्या मित्राकडून फसवणूक झाली, हा धक्का सहन न झाल्याने बँकच्या व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संभाजीनगरमध्ये ही धक्कादयक घटना घडली आहे. ‘मित्रा, फक्त माझ्यासारखे फसवू नको कोणाला. तुला हाथ जोडून सांगतो,’ असे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून या तरुणाने आत्महत्या केली आहे. विठ्ठल मधुकर सदार (वय 28 वर्ष, रा. खडकी सदार ता. रिसोड जि. वाशीम) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण बँक मॅनेजरचे नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी ठेवलेलं स्टेटस
“मित्रा माझी लाईफ खूप छान चालू होती रे…
तू जो माझ्यासोबत दगा फटका केलाना, फक्त माझाच नाही तर एक बापाचा आणि एका आईचा आधार घेऊन झाला… मी तर चाललो सोडून कारण तु जे केलस मी एवढं mhot ओझ नाही झेलू शकत मित्रा…
माझ्यासोबत केलं ना तू हे फक्त दुसऱ्याशी नको करू, माझी हत्या ही तुझी pnishment माझा हतेचे कारण तूच, तुझ नाव तर नाही घेत मित्र fkt माझ्यासारख फसू नको कोनला तुला हात जोडून सांगतो मित्रा….
आई बाबा मला माफ करा झाले तर आणि bahu आई बाबाला सांभाळ, अस अर्ध्यावर सोडून चलो मी thumhala आणि हा मी एका व्यक्तीला पण dil pasun…..”
मिळालेल्या माहितीनुसार, “वाशीम जिल्ह्यातील विठ्ठल सदार शिक्षणासाठी शहरात आला होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना दोन वर्षांपूर्वी एका खाजगी बँकेत त्याला असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरी लागली. विठ्ठल हा मित्रांसह नारळीबाग जुना बाजार वरखेड लक्ष्मी माता मंदिर शेजारील रूममध्ये राहत होता. त्याच्यासोबत राहणारे मुले देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. दरम्यान, नेहमीप्रमाणे इतर तिघे जण अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत गेले. त्यानंतर विठ्ठलचा भाऊ पुस्तक ठेवण्यासाठी रूमवर आला. तेव्हा विठ्ठल रूममध्ये बसलेला होता. परंतु, त्यानंतर विठ्ठलने व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून आत्महत्या केली.