छ. संभाजीनगर: लग्न करण्यासाठी तगादा लावलेल्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी ३१ वर्षीय सौरभ खंडू लाखे याला जन्मठेपेची शिक्षा आणि २५,००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ही घटना १५ ऑगस्ट २०२२ रोजी घडली होती. आरोपी लाखे याने प्रेयसीच्या घरी जाऊन तिची निर्घुण हत्या केली होती. सौरभ लाखे याचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तसेच मिळालेल्या वृत्तानुसार, खून केलेल्या प्रेयसीचेही दुसऱ्याशी लग्न झाले होते. दरम्यान, दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. परंतु तरीही तरुणीने लग्नासाठी तगादा लावला होता. दोघांमध्ये यामुळे वाद होऊ लागले होते. आरोपीने अनेक वेळेस नकार दिल्यानंतरही तरुणी ऐकत नव्हती.
दरम्यान, सौरभ व त्याच्या काही मित्रांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तरुणीच्या घरी जाऊन तिची गळा आवळून खुन केला. तरुणीची हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी सौरभ पुन्हा घटना स्थळी जाऊन तरुणीचे मुंडके व डावा हात कापले आणि पिशवीत भरून नेले. सौरभने ती पिशवी एका ठिकाणी लपवली, १७ ऑगस्ट २०२२ रोजी लाखे याने पीडितेच्या शरीराचे उरलेले अवयव विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असतांना नाकाबंदी होती म्हणून संपूर्ण प्रकार उघडकीस आला, दरम्यान, देवगाव रंगारीच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली.
तपासादरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह पुरावे गोळा केले आणि खटल्यादरम्यान २८ साक्षीदारांना सादर केले. सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की ,लाखे यांचे पीडितेशी विवाहबाह्य संबंध होते, जी स्वतः विवाहित होती आणि तिने लग्नाची मागणी केली तेव्हा आरोपीने तिची हत्या केली.
या प्रकरणी लाखेला कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि २५ हजारांच्या दंडासह कलम २०१ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. पुराव्याअभावी इतर दोन आरोपींची निर्दोष मुक्त करण्यात आली.