बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा मागच्या दीड महिन्यापासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात मराठा आणि वंजारी या दोन जाती समूहात वाद सुरू झाला होता. सरपंच हत्याकांडानंतर या जातीयवादाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडत आहे . अश्यातच आता जिल्ह्यातील सराकरी अधिकारी आणि पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच जातीवादी वतावरणाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे आता बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार आता बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी एकदुसऱ्याला आडणावाने हाक न मारता पहिल्या नावाने हाक मारणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा आदेश काय?
अधिक माहिती अशी की, सरपंच देशमुख यांच्या हत्ते नंतर बीड जिल्ह्यातील जातीय वातावरण पेटले आहे. त्यामुळे आता याच्या झळा जिल्ह्यातील प्रशासनापर्यंत पोहचल्या आहेत. आता बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड पोलिस प्रशासनातील जातीयवाद कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक महत्वाचा आदेश लागू केला आहे. आदेशानुसार पोलिसांनी एकदुसऱ्याला आडनावाने न हाक मारता आपल्या पहिल्या नावाने हाक मारायची आहे.
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील जातीय वातावरणाच्या तीव्र झळा प्रशासनाला देखील सहन कराव्या लागत आहेत. पोलिस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असल्याचे आणि ते आरोपींना मदत करत असल्याचे आरोप होत आहेत. त्यात आता हा जातीयवाद नष्ट करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी कर्मचऱ्यांना पहिल्या नावाने हाक मारण्याचे आदेश दिले आहेत.