पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पाऊस सुरु आहे. तर काही शहरात ऑक्टोबर हिट जाणवत आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने आजपासून काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच परतीच्या पावसाची चाल थांबली. त्यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भात काही जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, आज आणि पुढील काही दिवस राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पाऊस पडण्याची शक्यता आहे.