पुणे : अनेक भागांतील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगांची लाहीलाही होत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मार्गे वेगाने वाहणा-या उष्ण वा-यामुळे अनेक जिल्ह्यांमधील उष्णता वाढली आहे. त्यामुळे उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, कोकण किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ताशी 35 ते 40 किमी वेगाने उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहे. दणिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे. गुरुवारपासून पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.