Maharashtra Election 2024 Voting : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 288 मतदासंघांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दोन तासांत महाराष्ट्रात 6.61 टक्के मतदान पार पडलं आहे.
गडचिरोलीत 12.33 टक्के मतदान झाले आहे. तर, संभाजी नगर जिल्ह्यात आतापर्यंत अवघे 7.5 टक्के मतदान झाले आहे. वाशिममध्ये 6.38 टक्के मतदान झाले आहे. तर, रिसोडमध्ये 5.38 टक्के मतदान पार पडले आहे. तसेच कारंजामध्ये 4.06 टक्के मतदान पार पडलं आहे. मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे.
राज्यातील 9 कोटींहून अधिक मतदार आज आपल्या मतदानाचा वापर करुन नवीन सरकार निवडतील. सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत.