Mahabaleshwar News पाचगणी : भिलार ग्रामस्थांनी आपली घरे, पुस्तकाच्या दालनासाठी देऊन मनोभावे पर्यटकांचे स्वागत करतात हे कौतुकास्पद आहे. पुस्तकांच गाव हे देशासाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.
पुस्तकांच्या गावाला राज्यपालांची भेट
राज्यपाल हे महाबळेश्वर दौऱ्यावर आले असता भिलार येथील पुस्तकाच्या गावाला भेट देऊन त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली .
ते पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात ग्रंथालयात जाऊन वाचणार्यांची संख्या कमी झाली आहे. पण घराघरात पुस्तके ठेवून पुस्तकाचं गाव निर्माण होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. (Mahabaleshwar News ) ग्रामस्थ देत असलेल्या योगदानाबद्दल आणि गावाने प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याची आणि देत आसलेल्या योगदानाचे कौतुक राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील ,महाबळेश्वर च्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, वाई च्या पोलीस उपविभागीय अधिकारी शीतल जानवे – खराडे,भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे,उपसरपंच सुनीता भिलारे, वदंना भिलारे, नितीनदादा भिलारे,प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे,तानाजी भिलारे ,किसन भिलारे, तेजस्विनी भिलारे, शशिकांत भिलारे,रूपाली कांबळे, आनंदा भिलारे,अदि उपस्थित होते. (Mahabaleshwar News ) पुस्तकाच्या प्रकल्प कार्यालयाच्या भेटी प्रसंगी त्यांचे स्वागत राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील,सरपंच शिवाजी भिलारे,नितीनदादा भिलारे, तेजस्विनी भिलारे, प्रवीण भिलारे शशिकांत भिलारे यांनी केले.
त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक स्व.भि.दा. भिलारे गुरुजी यांच्या येथे असलेल्या शिवकालीन इतिहास दालन या पुस्तक दालनांस मा. राज्यपाल महोदयांनी भेट दिली. (Mahabaleshwar News ) यावेळी त्यांचे स्वागत प्रशांत भिलारे ,राजेंद्र भिलारे आणी त्यांच्या कुटूंबीयांनी केले त्यानंतर शिंदे गटाचे नेते प्रवीण भिलारे यांच्या निवासस्थानी कथा दालनास भेट दिली यावेळी प्रवीण भिलारे , वंदना भिलारे यांनी त्यांचे स्वागत केले
यावेळी बोलताना प्रवीण भिलारे म्हणाले भिलार हे स्वातंत्र्य सैनिक भि. दा.भिलारे गुरुजी यांचे गावं असून पुस्तकाच्या प्रकल्पासाठी विनोदजी तावडे आणि स्व.बाळासाहेब भिलारे यांचे योगदान आहे. (Mahabaleshwar News ) पुस्तकाच्या गावाबरोबरच स्ट्रॉबेरी साठीही हे गाव जगप्रसिद्ध आहे.
या वेळी पंचायत समिती, आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेवक वर्ग, अनेक पुस्तक दालनचालक, ग्रामपंचायतीतील महिला सदस्य, गावकरी उपस्थीत होते (Mahabaleshwar News )
राज्यपाल महाबळेश्वर दौऱ्यावर आले असताना पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात करण्यात आला होता .तसेच भिलार कडे येणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. (Mahabaleshwar News ) त्यामुळे पर्यटक आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News | फांदीने साथ सोडली पण पारंब्याने हात दिला…