महाराष्ट्र: महाराष्ट्राच्या महसूल विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्याचा फायदा राज्यातील नागरिकांना होणार आहे. १ मे पासून, विभाग “फेसलेस रजिस्ट्रेशन”, “स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन” आणि “एक राज्य, एक नोंदणी” प्रणाली सुरू करणार आहे. अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रणाली अंतर्गत नागरिक त्यांच्या आधार कार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्रांचा वापर करून त्यांच्या मालमत्तेची नोंदणी कुठूनही करता येणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही नागपूरमध्ये घर खरेदी करत असाल, तर तुम्ही आता पुण्यातून त्याची नोंदणी करू शकता. हि प्रणाली सुरु करण्याचा उद्देश भ्रष्टाचार कमी करणे, नागरिकांचा वेळ वाचवणे आणि महसूल व्यवहार अधिक पारदर्शक करणे हा आहे. राज्य सरकार “डिजिटल इंडिया” आणि “डिजिटल महाराष्ट्र” ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करत आहे आणि ही नवीन प्रणाली त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
नवीन महसूल प्रणाली नागरिकांना नक्कीच दिलासा देईल, ज्यामुळे भविष्यात मालमत्ता खरेदी, जमीन व्यवहार आणि नोंदणी अधिक कार्यक्षम आणि सुलभ होतील.’ डिजिटल इंडिया’ आणि ‘डिजिटल महाराष्ट्र’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा संकल्प आहे आणि आम्ही त्यावर काम करीत आहोत. यामुळे या प्रणालीचा फायदा नक्कीच अनेकांना होणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.