(Good News) पुणे : लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जात असतात असे म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय बिहारच्या सारण जिल्ह्यामधील लोकांना आला आहे. ३ फुट उंचीचा नवरा आणि साडे तीन फुट उंचीची नवरी यांनी जातीचे बंधने तोडली. आणि गडदेवी मंदिरात सप्तपदी घेऊन एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले आहे.
त्यांचा विवाह शुक्रवारी (ता.१०) रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात व धूमधडाक्यात पार पडला. दोघांची उंची कमी असल्याने ही जोडी देवानेच बनवली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे.
श्याम कुमार (वय-२३, रामकोलवा, चनचौरा, बिहार) आणि रेणू (वय-२०, भावलपूर, मधुरा अनुमंडर) अशी लग्न केलेल्या नवविवाहित जोडप्यांची नावे आहेत.
लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जात असतात…
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम कुमार हा ७ भावंडांमध्ये सर्वात मोठा असून त्याची केवळ ३ फूट उंची आहे. यामुळे त्यांचे लग्न होऊ शकत नव्हते.तर दुसरीकडे रेणूका ही सहा भावंडांमध्ये सर्वात लहान असून तिची साडेतीन फूट उंची आहे. कमी उंचीमुळे तिलाही लग्न करता येत नव्हते.
दरम्यान, शैलेश सिंह नावाचा व्यक्ती या दोघांसाठी देवदूत बनून आला होता. मुलांचे लग्न होत नसल्याने दोन्ही कुटुंब चिंतेत असल्याचे समजताच शैलेशने दोन्ही कुटुंबांची एकमेकांशी ओळख करून दिली एकमेकांना भेटताच दोन्ही कुटुंबातील नाते घट्ट झाले.
त्यानंतर शुक्रवारी दोघांनीही गडदेवी मंदिरात कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. वधू-वरांनी लग्नानंतर कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. या लग्नात वधू-वरांच्या कुटुंबीयांसह त्यांचे मित्र आणि शेजारीही सहभागी झाले होते. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे खूप खूश आहेत. आता हा अनोखा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime पुणे : विवाहानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार; प्रेयसीला अॅसिड टाकून मारण्याची धमकी