Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात… 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 24 February 2026, 14:03

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागाने सोमवार (23 जानेवारी) पासून रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारी रात्रीपासून अनेक महिलांना बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत.

98 कोटींची तरतूद

जानेवारी हप्ता वितरित करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल कल्याण विकास विभागाकडे 98 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. निधी प्राप्त झाल्यानंतर हप्त्याच्या वितरणास सुरुवात करण्यात आली.

 

लाभार्थी संख्येत घट

जानेवारी महिन्यात 14 तारखेच्या सुमारास डिसेंबर 2025 चा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यावेळी सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांना लाभ देण्यात आला होता.

योजनेची सुरुवात जुलै 2024 मध्ये झाली तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 2 कोटी 46 लाख होती. मात्र, राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यानंतर लाभार्थी संख्येत घट झाल्याचे दिसून आले. 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार 1 कोटी 90 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली; त्यापैकी योग्य तपशील सादर करणाऱ्या 1 कोटी 60 लाख महिलांनाच डिसेंबरचा हप्ता मिळाला.

ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदत

ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान चुकीचे पर्याय निवडलेल्या लाभार्थींना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. संबंधित महिलांना ही अंतिम मुदत असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत 19 हप्ते

जुलै 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत लाभार्थींना एकूण 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांचा लाभ घेणाऱ्या पात्र महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपयांची मदत दिली जाते.

दरम्यान, हप्ता वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होणार असल्याचे महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14

केसनंदमध्ये बिगर शेती परवान्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 35 लाखांची फसवणूक; वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 6 June 2026, 18:30
Next Post

Pune News: ड्रेनेज दुरुस्तीच्या बहाण्याने पुण्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 6 कोटींचा गंडा; पाईप लाईन पाहण्यासाठी घरात आला अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.