Good News : पुणे : राज्य सरकारचा गोविंदांच्या विम्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गोविंदांसाठी तब्बल १८ लाख ७५ हजारांची रक्कम विमा म्हणून मंजूर केली आहे. ही शासकीय विमा कवच योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.
विमा कवच योजना ८ सप्टेंबर पर्यंत लागू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच वर्षी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. तसेच राज्य सरकारनं नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना ७.५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. (Good News) तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच वर्षी केली होती. त्यानुसार, या वर्षासाठी गोविंदांच्या विमा कवच योजनेसाठी राज्य सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला आहे. यावर्षी दहीहंडी जवळ आली असून राज्यभरात दहीहंडीसाठी गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकांचा सरावही जोरात सुरू आहे. गोविंदांसाठी राज्य सरकारनं १८ लाख ७५ हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. (Good News) ही योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश काढून राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी ५० हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आलं होतं. पण आता ही संख्या वाढवून ७५ हजारांपर्यंत करण्यात आली आहे. (Good News) म्हणजेच, राज्यभरातील ७५ हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त २५ हजार गोविंदांना राज्य सरकारनं विमा कवच दिलं आहे.