बापू मुळीक
सासवड : पिसे (ता. पुरंदर )येथे सासवड -पारगाव- पिसर्वे -रिसेपिसे- सुपा ते भिगवणपर्यंत चालू असणाऱ्या कामानिमित्त राजपथ इन्फ्रा प्रा. लिमिटेड कंपनीचा कॅम्प व आर. एम. सी. प्लांट आठ ते दहा महिने मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आला आहे.त्यासाठी काही शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर कंपनीने घेतली आहे. त्या ठिकाणी कंपनीच्या असणाऱ्या गाड्या, कामगार यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु राजपथ इन्फ्रा कंपनीने कॅन्टीन, बेसिन, सांडपाणी यासाठी एका मोठ्या शोष खड्ड्यामध्ये पाणी सोडले असून, मूळ म्हणजे खडकातून शेजारील गट नंबर 140 मधील विहीर व बोरमध्ये ते पाणी उतरत आहे. त्याचा परिणाम तेथील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबावर, जनावरे, यांच्या आरोग्यावर झालेला आहे.
दरम्यान सात महिने झाले त्या गटांमध्ये अल्कोहोलच्या बाटल्या, शेतात, विहिरीत मोठ्या प्रमाणावर फेकल्या गेल्या आहेत. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. त्या ठिकाणच्या तीन जनरेटरच्या आवाजामुळे,रात्रीच्या वेळी सिक्युरिटीची फिसल वाजवल्यामुळे अनेक महिने शेतकऱ्यांना त्रास होत आहे. यावर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना धमकावले जात असून असा काहीच प्रकार होत नाही असं सांगितलं जात आहे.
शेजारील गट नंबर 140 मधील शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेले आहे ते देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करत आहेत. तसेच उलट दमदाटी आणि अरेरावीची भाषा करत आहेत. या शेतकऱ्याच्या दुसऱ्या गट नंबर 148 मध्ये सुद्धा खडी त्यांच्या गाडीने आणत असताना, कंपनीमधील अधिकाऱ्यांनी दमदाटी, छळवणूक करून या शेतकऱ्याला, गावातील काही व्यक्तींना हाताशी धरून, त्रास देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. या शेतकऱ्यांनी नियमाने कंपनीशी पत्र व्यवहार, ग्रामपंचायत, जेजुरी पोलीस स्टेशन, तहसीलदार ऑफिस, उपविभागीय पोलीस अधिकारी, आरोग्य विभाग पुरंदर, विद्यमान आमदार, माजी आमदार, गट विकास अधिकारी पुरंदर यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे, परंतु आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.
यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागाने त्या ठिकाणच्या पाण्याचा नमुना घेऊन अहवाल शेतकऱ्याकडे सादर केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामध्ये कंपनीने सात महिने झाले शेतकरी आवाज उठवत आहेत तरी त्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.या ठिकाणी अधिकार्यांची चूक आहे असं सांगण्यात आलं आहे. शेवटी या शेतकऱ्याने कंटाळून 14 मे रोजी राजपथ कंपनीच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार असण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामध्ये वैयक्तिक, गावासाठी, गावातील तरुणांच्या काही मागण्या आहेत, वैयक्तिक माझ्या विहीर, बोरवेलचे जे काही नुकसान झाले आहे, ते सात महिन्यांमध्ये कंपनीतील अधिकाऱ्यांनी काही लक्ष दिले नाही. कॅनॉलच्या शेजारी असणाऱ्या शेतजमिनी मध्ये माझे झालेले नुकसान, धुळीचा त्रास, दारूच्या बाटल्या, विहिरीत फेकलेल्या त्यांच्या आजतागायत काही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला नाही. तेव्हा मी स्वत: माझे सहकारी, साखळी उपोषणाला बसणार आहेत असा मजकुराचा अर्ज जेजुरी पोलीस स्टेशनला दिला आहे.
सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशनवाये मु. पो. 1951 चे कलम 37 (1) व( 3 )ची अंमल भारतीय नागरी संहिता 2023 कलम 168 अन्वये नोटीस शेतकऱ्याला जारी करण्यात आली असून, या आंदोलनामुळे काही अनुचित प्रकार, कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने पूर्ण करून घ्याव्यात. तरी सदरचे आंदोलन 14 मे रोजी चे स्थगित करावे, व प्रशासनाला सहकार्य करावे. तर आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने संबंधित कार्यालयाबरोबर पत्र व्यवहार करून, पूर्ण करून घ्याव्यात असे म्हटले आहे.सध्या तरी शेतकऱ्याकडून आमरण उपोषण स्थगित केले असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकदिपक वाकचौरे यांना मिळाली आहे.
दरम्यान गट नंबर 140 मध्ये विहीर, बोरमध्ये पाणी शोष खड्ड्यातून उतरत नाही, अल्कोहोल बाटल्या, शेतात, विहिरीत टाकलेल्या त्या उचलायला लावलेल्या आहेत. अधिकाऱ्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, घेतलेला शोषखड्डा खाली घेतलेला आहे, विहीर व बोर चढावरती आहे, मुरमातून पाणी चढावर जाऊ शकत नाही. असे मत शिवा केशरेड्डी, मॅनेजर, राजपथ इन्फ्रा प्रा. लिमिटेड व आर. एम. सी. प्लांट यांनी सांगितले आहे.