Chief Minister’s Aid Fund News : मुंबई : ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मार्फत विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. मात्र हे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. (Chief Minister’s Aid Fund News) त्यामुळे अनेकांना मदत मिळण्यास अडचणी येत होत्या. आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मिळणार आहे. (Don’t worry! Now you will get an application for Chief Minister’s Aid Fund on a missed call)
तातडीने मदत करणे हा उद्देश या योजनेचा आहे. मात्र, ही रक्कम मिळवण्यासाठी नेमकी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कुठे संपर्क साधायचा? याची माहिती अनेकांना नसते. (Chief Minister’s Aid Fund News) पण आता एका मिस्ड कॉलवर मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मिळणार आहे.
अर्थसहाय्य मिळणे होणार सुलभ
मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणाऱ्या मदतीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. (Chief Minister’s Aid Fund News) यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना हा अर्ज करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, आता वरील क्रमांकावर मिस्ड कॉलवर देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आतापर्यंत तब्बल 60 कोटींवर मदतनिधीचे वाटप करण्यात आले आहे. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होत असतात.(Chief Minister’s Aid Fund News)
यासाठी आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज दाखल केल्यानंतर आठ दिवसात वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते. मात्र, हा अर्ज घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंत्रालयातील कक्षापर्यंत पोहोचणे ग्रामीण भागातील जनतेला शक्य होत नाही. (Chief Minister’s Aid Fund News)अशा जनतेसाठी ही मिसकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत अनेकदा रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाइकांना माहिती नसते. त्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Chief Minister’s Aid Fund News)पण आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला आहे. आता एका मिसकॉलवर हा निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीसाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमकांवर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाईलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावा लागेल. (Chief Minister’s Aid Fund News) मुख्यमंत्री सहायता निधीतून पहिल्यांदाच भाजलेल्या, शॉक लागलेल्या रुग्णांना देखील प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar : वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी..