मुंबई : राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आले आहे. याबाबत ३ ऑक्टोबर २०२२ ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
LIVE | Replying to the discussion on supplementary demands in Maharashtra Legislative Assembly.#MahaBudgetSession2023 #BudgetSession2023 #Maharashtra https://t.co/B3IelreQoE
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 2, 2023
सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील विधानसभेत उत्तर देतांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, उद्दोग, उर्जा व कामगार विभागाच्या सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली. त्यावर सभागृहातील सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील समस्या मांडून विविध सूचना केल्या.
विधानसभेतील सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येवून त्याविषयी सदस्यांना कळविण्यात येणार असल्याचे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत सांगितले.