पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीचा इयत्ता १२वीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. विद्यार्थी त्यांच्या निकालांची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मे २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इयत्ता १० वीचा निकाल मे २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी अधिकाऱ्यांना वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले. माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी अधिकाऱ्यांना वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल तपासण्यात काही अडचणी येऊ नये, सगळे सुरळीत व्हावा यासाठी, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे आणि तिची सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत.
निकाल जाहीर झाल्यावर वेबसाइटवर अपेक्षित असलेल्या उच्च ट्रॅफिकला तोंड देण्यासाठी नियमित लोड टेस्टिंग आणि क्षमता वाढवण्याची गरज यावर मंत्र्यांनी भर दिला. तांत्रिक त्रुटी रोखण्यासाठी उपाययोजना तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी आणि वेबसाइटची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबद्दल सात दिवसांत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश आयटी विभागाला देण्यात आले आहेत.
मागील वर्षांमध्ये विद्यार्थी त्यांचे निकाल तपासत असताना वेबसाइटला ज्या प्रकारच्या तांत्रिक समस्या आल्या होत्या त्या टाळण्यासाठी हि उपाययोजना करण्यात आली आहे. विद्यार्थी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल २०२५ ऑनलाइन पाहू शकतील. विद्यार्थ्यांचा रोल नंबर आणि इतर ओळखपत्रांचा वापर करून निकाल तपासता येईल. महाराष्ट्र बोर्ड निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहे. निकाल जाहीर होण्याची अपेक्षित तारीख जवळ येत असल्याने, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.